येशु चार हजार लोकसले जेवण देस
1 त्या दिनले लोकसनी मोठी गर्दी जमेल व्हती अनी त्यासनाकडे खावाकरता काहीच नव्हतं, म्हणीन येशुनी आपला शिष्यसले बलाईसन त्यासले सांगं, 2 "माले या लोकसनी किव ई ऱ्हायनी कारण त्या तीन दिनपाईन मनासंगे शेतस अनी आते त्यासनाजोडे खावाकरता काहीच नही. 3 अनी जर मी त्यासले भूक्या तिश्या घर जावाले लाई दिधं. तर त्या वाटमाच काल्या वाल्या करतीन कारण त्यासमा बराचजन दूरतीन येल शेतस."
4 त्याना शिष्यसनी त्याले सांगं, "आठे ओसाड प्रदेशमा ह्या पोटभर खातीन इतलं जेवण कोण लई ई?"
5 येशुनी त्यासले ईचारं, "तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस?" त्यासनी सांगं, "सात."
6 मंग येशुनी लोकसले जमीनवर बसाले सांगं, त्या सात भाकरी लिसन देवना आभार मानात अनी त्या मोडीसन शिष्यसना जोडे वाढाकरता दिध्यात अनी त्यासनी लोकसले वाढ्यात. 7 त्यासनाजोडे काही धाकला मासापन व्हतात येशुनी त्यावर देवना आभार मानीन त्या पण वाढाले सांगात. 8 सर्वासनी पोटभर जेवण करं अनी जे उरनं त्याना सात टोपला भऱ्यात. 9 तठे जेवणकरता जवळजवळ चार हजार माणसे व्हतात. मंग येशुनी त्यासले घर जावाले लायं.