येशुना नातेवाईक
46 मंग येशु लोकसनी गर्दीसंगे बोली ऱ्हाईंता, दखा, त्यानी माय अनं त्याना भाऊ त्यानासंगे बोलाकरता बाहेर उभा ऱ्हायेल व्हतात. 47 तवय कोणी तरी येशुले सांगं, दख, तुनी माय अनं तुना भाऊ तुनासंगे बोलाकरता बाहेर उभा ऱ्हायेल शेतस. 48 पण येशुनी त्या सांगणाराले उत्तर दिधं, कोण मनी माय अनं कोण मना भाऊ? 49 अनी येशु आपला शिष्यसकडे हात दखाडीन बोलना, "दखा, मनी माय अनं मना भाऊ! 50 कारण जो कोणी मना स्वर्गना बापना ईच्छाप्रमाणे करस तोच मना भाऊ, बहिण, अनं माय शे."