निदाणना दृष्टांत
24 त्यानी त्यासले दुसरा दृष्टांत दिधा की, स्वर्गनं राज्य त्या माणुसना मायक शे, ज्यानी आपला शेतमा चांगलं बी पेरं. 25 लोके झोपमा व्हतात तवयच त्याना वैरी ईसन गहुमा निदण13:25 निदण वावरमा बिनकामनं उगनारं गवत पेरीसन गया; 26 पण जवय शेतमा पिकले पानटा फुटीन अनं कणीसमा दाणा वनात तवय निदण बी दखायनात. 27 तवय घरमालकना नोकरसनी ईसन त्याले सांगं, महाराज, आपन आपला शेतमा चांगलं बी पैरा ना? मंग त्यामा निदाण कोठेन वनं? 28 तवय मालक त्यासले बोलना, हाई काम कोणी वैरीनं शे. नोकरसनी त्याले सांगं, आम्हीन जाईसन त्यासले गोया करूत अशी तुमनी ईच्छा शे का? 29 तो त्यासले बोलना, नही, तुम्हीन निदाणले गोया करशात त्यानाबरोबर कदाचित गहुले पण उपटी टाकशात 30 कापणीनी येळपावत दोन्हीसले बराबर वाढू द्या, मंग कापणीना येळले मी मजुरसले सांगसू की, पहिले निदाण गोया करा, अनं जाळाकरता त्याना पेंढ्या बांधा; अनी गहु मना कोठारसमा साठाडा.