3 मंग त्यानी त्यासले दृष्टांत दिसन बऱ्याच गोष्टी सांगात तवय तो बोलना, "दखा, एक पेरणारा पेरणी कराले निंघना." 4 अनी तो पेरी राहिंता तवय काही बीया वाटवर पडनात अनं पक्षीसनी ईसन ते खाई टाकं. 5 काही खडकाळ जमीनवर पडनात, तठे त्यासले पुरेशी जास्त माती मिळनी नही, अनी माती जास्त खोलपावत नव्हती म्हणीन त्या लवकर उगनात. 6 अनी जवय सुर्य वर निंघना तवय त्यासले उन लागनं अनं त्या लगेच वाळाई गयात कारण त्यासले मुयाच नव्हतात. 7 काही काटेरी झुडपसमा पडनात; पण काटासना झुडपासनी वाढीसन त्यासनी वाढले दाबी टाकं. 8 काही बीया चांगली जमीनवर पडनात, मंग त्यासनं कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, अस पीक वनं. 9 अनी येशु त्यासले बोलना, ज्यासले कान शेतस त्या ऐकोत.