पाच हजारसले जेवण
13 हाई ऐकीसन येशु तठेन नावमा बशीन निंघना अनी एकांतमा गया; हाई ऐकीसन लोकसनी गर्दी नगरमातीन त्यानामांगे पायीपायी गयी. 14 मंग त्यानी बाहेर ईसन लोकसनी गर्दी दखी; तवय त्याले त्यासनी किव वनी अनं त्यासनामा बराच रोगीसले त्यानी बरं करं. 15 मंग संध्याकाय व्हवावर त्याना शिष्य त्यानाकडे ईसन बोलनात, हाई एकांतनी जागा शे अनं येळ व्हई जायेल शे; तर लोकसनी गावमा जाईसन स्वतःकरता खावाले अन्न ईकत लई येवाले पाहिजे म्हणीसन त्यासले निरोप द्या. 16 येशु त्यासले बोलना, लोकसले जावानी गरज नही; तुम्हीनच त्यासले खावाले द्या. 17 त्या त्याले बोलनात, आमनाजोडे फक्त पाच भाकरी अनं दोन मासा शेतस. 18 येशुनी सांगं, ते ईकडं मनाजोडे आणा. 19 मंग येशुनी लोकसनी गर्दीले गवतमा बसानी आज्ञा करी अनी त्या पाच भाकरी अनं दोन मासा लिसन त्यानी वर आकाशमा दखीन आशिर्वाद मांगा अनी भाकरी मोडीसन शिष्यसकडे दिध्यात अनं शिष्यसनी त्या लोकसले वाढी दिध्यात. 20 मंग त्या सर्वा खाईसन तृप्त व्हईनात; अनी उरेल तुकडासना बारा टोपला त्यासनी भरी लिध्यात. 21 खाणारा सर्वा पाच हजार माणसं व्हतात; अनी बाया अनं पोऱ्या या अजुन निराळाच व्हतात.