येशु समुद्रवरतीन चालस
22 नंतर, मी लोकसनी गर्दीले निरोप दिसन येस तोपावत तुम्हीन नावमा बशीन मनापुढे दुसरी बाजुले जा, अस म्हणीसन येशुनी शिष्यसले लगेच धाडी दिधं. 23 मंग लोकसले निरोप देवावर तो प्रार्थना कराले डोंगरवर एकलाच गया अनी रात व्हवावर पण येशु तठे एकलाच व्हता. 24 ईकडं वारा तोंडना दिशातीन ऱ्हावामुये किनारापाईन बराच अंतरमा नाव समुद्रना मधला भागमा लाटासघाई हैराण व्हई जायेल व्हती. 25 तवय पहाटले तीन ते सव वाजाना दरम्यान येशु समुद्रवरतीन चालत त्यासनाजोडे वना. 26 शिष्य त्याले समुद्रवरतीन चालतांना दखीसन घाबरी गयात अनं त्या भ्याईसन वरडनात; हाई भूत शे. 27 पण येशु त्यासले लगेच बोलना, धीर धरा मी शे; घाबरू नका. 28 तवय पेत्रनी उत्तर दिधं, प्रभुजी, जर तुम्हीन शेतस तर पाणीवरतीन तुमना जोडे येवाले माले सांगा.
29 त्यानी सांगं, ये; तवय पेत्र येशुकडे जावाकरता नावमाईन उतरीसन चालाले लागना; 30 पण वारा दखीसन तो भ्याईना अनी बुडाले लागना तवय तो वरडना, प्रभुजी, माले वाचाडा.
31 येशुनी लगेच हात पुढं करीसन त्याले धरं अनं बोलना, अरे अल्पईश्वासी तु शंका कशाले धरी?
32 मंग त्या नावमा चढनात तवय वारा बंद पडना. 33 तवय ज्या नावमा व्हतात त्या सर्वा त्याना पाया पडीसन बोलनात, तुम्हीन खरोखर देवना पोऱ्या शेतस.