3 त्यानी त्यासले उत्तर दिधं, तुमना रितीरिवाजकरता तुम्हीन बी देवनी आज्ञा का बर मोडतस? 4 कारण देवनी सांगेल शे की, तु "तुना बाप अनी तुनी माय यासना मान ठेव," अनी जो कोणी बापनी किंवा मायनी निंदा करस त्याले मरणदंडनी शिक्षा व्हई; 5 पण तुम्हीन सांगतस की, जो कोणी स्वतःना माय बापले अस सांगी, मी जे तुमले देणार व्हतु, ते मी देवले अर्पण करी टाकं. 6 त्यानी स्वतःना मायबापना मान नही ठेवा तरी चाली, हाई सांगीन तुम्हीन तुमना रितीरिवाजकरता देवनं वचन मोडी टाकेल शे.