चार हजार लोकसले जेवण
32 मंग येशुनी आपला शिष्यसले बलाईन सांगं, माले लोकसनी किव ई राहीनी, कारण तिन दिनपाईन त्या मनासंगे शेतस अनी त्यासनाजोडे खावाले काहीच नही; कदाचित त्या वाटमा मरगळेलना मायक पडतीन; म्हणीन त्यासले भूक्या धाडानी मनी ईच्छा नही शे. 33 शिष्यसनी त्याले सांगं, असा जंगलमा इतला लोकसनी भूक मिटी इतल्या भाकरी आमनाजोडे कोठेन येतीन? 34 येशुनी त्यासले ईचारं, तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस? त्या बोलणात सात भाकरी अनं काही धाकला मासा. 35 मंग त्यानी लोकसनी गर्दीले जमीनवर बठाले सांगं. 36 नंतर त्यानी त्या सात भाकरी अनं धाकला मासा लिसन देवना उपकार मनीन; त्या मोडीसन शिष्यसले दिध्यात अनी शिष्यसनी ते लोकसले वाटी दिध्यात. 37 मंग त्या सर्वा खाईसन तृप्त व्हयनात अनी उरेल तुकडसना सात टोपला भरी लिधात. 38 जेवढासनी खादं त्यानामा बाया अनं पोऱ्या सोडीसन चार हजार माणसे व्हतात.