स्वर्गना राज्यमा मोठा कोण?
1 १८:१ लूक २२:२४ त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? 2 तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; 3 १८:३ मार्क १०:१५; लूक १८:१७मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. 4 यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई;