भाऊ बहिणीसना पाप
15 १८:१५ लूक १७:३ जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया. 16 पण त्यानी जर तुनं नही ऐकं तर तु आखो दोन एक जणसले तुनासंगे लई जा; यानाकरता की, तुम्हीन दोन्ही जे बोलशात त्या प्रत्येक शब्दना ज्या दोन किंवा तीन शेतस त्या साक्षीदार राहतीन अनी त्या बी समजाडतीन. 17 अनी जर त्यानी त्यासनं बी ऐकं नही तर मंडळीले सांग; अनी त्यानी मंडळीनं बी नही ऐकं तर, तो तुनासाठे एक जकातदार किंवा परकानामायक व्हवो.
विरोध करानं अनी परवानंगी देवानं
18 १८:१८ मत्तय १६:१९; योहान २०:२३ मी तुमले सत्य सांगस की, जे काही तुम्हीन पृथ्वीवर बंद करशात ते स्वर्गमा बंद व्हई; अनी जे काही तुम्हीन पृथ्वीवर खोलशात, ते स्वर्गमा खोलाई जाई.
एकत्र प्रार्थना
19 आखो मी तुमले सत्य सांगस, पृथ्वीवर तुमना मातीन दोनजण कोणतीही एक गोष्टकरता एकचित्त व्हईन ईनंती करतीन तर ती ईनंती मना स्वर्ग माधला बापकडतीन पुरी कराई जाई; 20 कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.