येशु धाकला पोऱ्यासले आशिर्वाद देस
13 नंतर येशुनी लेकरसवर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे म्हणीन त्यानाजोडे त्यासले आणं; पण शिष्यसनी आणनारासले धमकाडं. 14 येशु बोलणा, बालकसले मनाकडे येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण स्वर्गनं राज्य यासना मायकसनंच शे. 15 मंग त्यासनावर हात ठेईन आशिर्वाद दिसन तो तठेन निंघी गया,