23 तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं, मी तुमले सत्य सांगस की, स्वर्गना राज्यमा धनवानसना प्रवेश व्हणं कठीण शे. 24 आखो तुमले सांगस, देवना राज्यमा धनवानसना प्रवेश व्हणं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जाणं सोपं शे. 25 हाई ऐकीन शिष्य भलताच थक्क व्हईसन बोलणात, तर मंग कोणं तारण व्हई? 26 येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"