3 हेरोद राजानी जवय हाई ऐकं तवय तो अनं पुरं यरूशलेम घाबरी गयं. 4 तवय त्यानी लोकसना मुख्य याजक, अनी शास्त्रीसले बलाईसन ईचारं की, ख्रिस्तना जन्म कोठे व्हणार शे? 5 त्यासनी त्याले सांगं, "यहूदीयाना बेथलहेम गावमा" कारण संदेष्टासनाद्वारा असच लिखेल शे, की. 6 "हे यहूदाना प्रदेश बेथलहेम? तु यहुदाना सर्व सरदारसमा कनिष्ठ शे; अस अजिबात नही? कारण मना इस्त्राएल लोकसले संभाळी असा सरदार तुनामातीन निंघी."
7 तवय ज्योतिषीसले हेरोद राजानी गुपचुप बलाईसन तारा दखावानी येळ नीट ईचारी लिधी. 8 त्यासले बेथलहेमले धाडतांना सांगं, "तुम्हीन जाईसन त्या बाळबद्दल नीट ईचारपुस करा, शोध लागी तवय माले बी निरोप द्या, म्हणजे मी पण ईसन त्याले नमन करसु."