द्राक्षमयामधला मजुरसना दृष्टांत
1 "स्वर्गना राज्य त्या घरमालकना मायक शे; जो आपला द्राक्षमयामा रोजी मजुर लावाकरता सकायमा बाहेर निंघना." 2 अनी त्यानी रोजनी मजुरी एक चांदिना शिक्का ठराईन मजुरसले द्राक्षमयामा धाडी दिधं. 3 मंग तो जवळपास नऊ वाजाले घरना बाहेर गया, तवय त्यानी काही जणसले बजारमा रिकामं उभं दखं. 4 तो त्यासले बोलना, तुम्हीन बी द्राक्षमयामा जा, जी मजुरी व्हई ती मी तुमले दिसु; अनी त्या गयात. 5 मंग जवळपास बारा वाजता अनं तिन वाजता तो बाहेर गया तवय पण त्यानी तसच करं. 6 जवळपास पाच वाजाले तो बाहेर गया, तवय आखो कित्येक जणसले रिकाम उभं दखं. तवय त्यानी त्यासले ईचारं, तुम्हीन पुरा दिन का बर आठे रिकामा उभा राहेल शेतस? 7 त्या त्याले बोलणात, आमले कोणी कामवर लाय नही म्हणीन त्यानी त्यासले सांगं, तुम्हीन बी मना द्राक्षमयामा जा. 8 मंग संध्याकायले द्राक्षमयाना मालकनी त्याना कारभारीले सांगं, मजुरसले बलाई आनं अनी शेवटला मजुरसपाईन सुरवात करीसन पहिला मजुरपावत त्यासले मजुरी दे. 9 तवय जवळपास संध्याकायना पाच वाजता ज्यासले कामवर लायल व्हतं त्यासले पुरा रोज एक चांदीना शिक्का भेटना. 10 मंग पहिला मजुर वनात अनी आपले त्यासनापेक्षा जास्त मजुरी भेटी अस त्यासले वाटणं, पण त्यासले बी तेवढाच रोज भेटना. 11 तो त्यासनी लेवानंतर त्या मालकबद्दल कुरकुर करीसन बोलणात, 12 ह्या शेवटलासनी एकच तास काम करा अनी आम्हीन दिनभर ऊनतान्हमा कष्ट करात तरी तुम्हीन आमले अनी त्यासले मायकच रोज दिधा. 13 तवय त्यानी मजुरसमधला एकले उत्तर दिधं, अरे दोस्त, मी तुनावर अन्याय नही करा. हाईच मजुरीमा दिनभर काम करानं, हाई आपलं ठरेल व्हतं ना. 14 जे तुले भेटेल शे ते लिसन निंघी जाय; जेवढं तुले तेवढं शेवटनासले पण देवानं अशी मनी ईच्छा शे. 15 जे मनं शे त्यानं मी मना मर्जीप्रमाणे करसु, मी कोणा बांधायेल शे का? मनं उदार वागनं तुना डोयामा येस का? 16 २०:१६ मत्तय १९:३०; मार्क १०:३१; लूक १३:३०याप्रमाणेच शेवटला त्या पहिला अनी पहिला त्या शेवटला व्हतीन.