25 २०:२५ लूक २२:२५,२६येशुनी त्यासले बलाईसन सांगं, गैरयहूदीसमा अधिकारी प्रभुत्व चालाडतस अनं मोठा लोके बी अधिकार गाजाडतस हाई तुमले माहीत शे. 26 २०:२६ मत्तय २३:११; मार्क ९:३५; लूक २२:२६पण तुमनामा तसं व्हवाले नको; म्हणीन तुमनामा ज्याले कोणले श्रेष्ठ होणं शे, त्यानी पहिले तुमना सेवक व्हवाले पाहिजे.