दोन आंधयासले दृष्टीदान
29 मंग त्या यरीहो शहरतीन जाई राहींतात तवय लोकसनी मोठी गर्दी त्यासना मांगे चाली राहींती. 30 तवय दखा, वाटवर बशेल दोन आंधयासनी येशु जवळतीन जाई राहीना, हाई ऐकीन, त्या वरडीसन बोलणात, "प्रभु, अहो दावीदना पोऱ्या, आमनावर दया करा." 31 तवय त्यासले लोकसनी वरडू नका अस धमकाडं, पण त्या जास्तच वरडीन बोलु लागणात, "प्रभु, अहो दावीदना पोऱ्या! आमनावर दया करा." 32 येशुनी ऊभं राहीसन त्यासले बलाईन सांगं, "मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?" 33 त्या बोलणात, "प्रभुजी, आमनी ईच्छा शे की, आमना डोया उघडी जावोत." 34 तवय येशुले त्यासनी किव वनी त्यानी त्यासना डोयाले स्पर्श करा; तवय त्यासले लगेच दखावु लागनं, अनी त्या त्याना मांगे चालु लागणात.