17 तुमले काय वाटस हाई आमले सांगा, कैसरले कर देवाणा हाई योग्य शे की नही? 18 येशु त्यासना मनमाधलं कपट वळखीन बोलना, अरे ढोंगीसवन का बर मनी परिक्षा दखतस? 19 कर देतस ते नाणं दखाडा; तवय त्यासनी त्यानाजोडे एक नाणं अनी दिधं. 20 त्यानी त्यासले ईचारं, यावर कोणं चित्र अनं लेख शे? 21 त्या बोलनात, रोमना राजानं; येशुनी त्यासले सांगं, तर मंग राजानं शे, ते राजाले अनी देवना शे, ते देवले भरी द्या.
Publicidade