दुःख अनी तरास
3 येशु जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय त्याना शिष्यसनी त्यानाकडे ईसन ईचारं, "ह्या गोष्टी कवय व्हतीन अनी तुमनं येवानं अनी ह्या युगना समाप्तीनं चिन्ह काय शे, हाई आमले सांगा."
4 येशुनी त्यासले उत्तर दिधं, तुमले कोणी फसाडाले नको म्हणीन जपी ऱ्हा. 5 कारण बराच लोके मनं नाव लिसन येतीन अनी मी ख्रिस्त शे अस म्हणतीन अनी बराच जणसले फसाडतीन. 6 जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय संभाळा घाबरू नका कारण अस व्हवानं आवश्यकच शे, पण तेवढामा शेवट व्हवाव नही.