ईश्वासु किंवा अईश्वासु दास
45 असा ईश्वासु अनं ईचारशील कारभारी कोण शे? ज्याले त्याना मालक आपला सेवकसवर अधिकारी नेमी यानाकरता की, तो त्यासले येळवर जेवण दी. 46 मालक ई तवय जो दास तसं करतांना त्याले दखाई, तो दास धन्य! 47 मी तुमले सत्य सांगस की, मालक त्या दासले आपली सर्व मालमत्तावर अधिकारी नेमी. 48 पण जर तो दुष्ट दास व्हई तर तो आपला मनमा म्हणी, मना मालकले येवाले आखो बराच येळ लागी. 49 अनी तो आपला सोबतना दाससले मारू लागना अनं दारूड्याससंगे खाऊ पिऊ लागना, 50 तवय दास मालकनी वाट दखत नही त्या दिनले अनी त्याले माहीत नही त्या येळले त्याना मालक ईसन, 51 त्या दासले कापी टाकी अनी ढोंगीसनासंगे त्याले टाकी दी. तठे रडनं अनी दात खानं चाली