36 उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात; आजारी व्हतु तवय माले दखाले वनात, बंदिगृहमा व्हतु तवय माले भेटाले वनात. 37 त्या येळले धार्मीक लोक त्याले उत्तर देतीन की, प्रभुजी, आम्हीन तुमले कवय भूक लागेल दखीन खावाले दिधं? कवय तिश लागेल दखीन पाणी पेवाले दिधं? 38 तुमले कवय अनोळखी समजीसन घरमा लिधं? उघडा दखीसन कवय तुमले कपडा दिधात? 39 अनी तुम्हीन आजारी शेतस किंवा बंदिगृहमा शेतस हाई दखीन कवय आम्हीन तुमले दखाले वनु? 40 तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!