गेथशेमाने बागमा येशुनी प्रार्थना
36 नंतर येशु त्याना शिष्यससंगे गेथशेमाने नावना बगीच्यामा वना, "मी पुढे जाईन प्रार्थना करस तोपावत तुम्हीन आठे बठा." 37 मंग त्यानी पेत्र अनं जब्दीना दोन्ही पोऱ्या यासले संगे लिधं अनं तो खुपच खिन्न अनं कष्टी व्हवाले लागना. 38 तवय तो त्यासले बोलना, "मना जीव" मरणप्राय, खुपच खिन्न व्हई जायेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी मनासंगे जागा ऱ्हा.
39 मंग तो थोडा पुढे जावानंतर पालथा पडिन अशी प्रार्थना कराले लागना की, "हे मना पिता व्हई तर हाऊ दुःखनां प्याला मनावरतीन टळी जावो! तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे."
40 मंग तो शिष्यसना जोडे वना अनी त्या झोपेल शेतस हाई दखीन पेत्रले बोलना, काय! एक तास बी तुमनाघाई जागं ऱ्हावायनं नही का? 41 तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
42 परत दुसरी दाव जाईसन येशुनी हाई प्रार्थना करी की, "हे मना पिता, जर हाऊ प्याला मी पेवाशिवाय टळाव नही तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे." 43 मंग त्यानी परत ईसन त्यासले झोपेल दखं; कारण झोपमुये त्यासना डोया जड व्हयेल व्हतात. 44 परत तो त्यासले सोडीन गया अनी परत त्यानी तिसरांदाव त्याच शब्दसमा प्रार्थना करी. 45 परत तो शिष्यसकडे ईसन बोलना, काय तुम्हीन अजुन आरामशीर झोपी राहिनात? दखा! येळ जवळ येल शे, मनुष्यना पोऱ्या पापी लोकसना हातमा देवाई जाई राहिना. 46 ऊठा, चला. दखा, माले धरी देणारा जोडे येल शे.