येशु मासा धरणारासले बलावस
18 मंग येशु गालील समुद्रना जोडेतीन चाली राहिंता. तवय त्यानी शिमोन पेत्र अनी त्याना भाऊ आंद्रिया या दोन्ही भाऊसले समुद्रमा जाळं टाकतांना दखं; कारण त्या मासा धरणारा व्हतात. 19 येशुनी त्यासले सांगं, "मनामांगे या, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु." 20 त्यासनी लगेच जाळं तठेच सोडं अनी त्या त्याना मांगे निंघनात. 21 तठेन पुढे जावानंतर त्यानी दूसरा दोन्ही भाऊ म्हणजे, जब्दीना पोऱ्या याकोब, अनं योहान यासले आपला बाप जब्दीनासंगे नावमा जाळं सवारतांना दखं, अनी येशुनी त्यासले बलायं. 22 मंग त्यासनी लगेच त्यासना बाप अनं नावले सोडीसन त्यानामांगे चालु लागनात.