मिठ अनं दिवावरतीन धडा
13 ५:१३ मार्क ९:५०; लूक १४:३४,३५ तुम्हीन पृथ्वीना मीठ शेतस; पण जर मीठना खारटपणाच निंघी गया तर तो खारटपणा त्याले कशाघाई आणता ई? ते काय कामनं ऱ्हावाव नही, तर ते फेकाई जाई अनी लोकसना पायखाल चेंदाई जाई. 14 ५:१४ योहान ८:१२; ९:५तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही. 15 ५:१५ मार्क ४:२१; लूक ८:१६; ११:३३दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. 16 ५:१६ १ पेत्र २:१२तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.