2 यामुये तु जवय दानधर्म करस तवय लोकसनी आपला गौरव कराले पाहिजे म्हणीसन ढोंगी जसा सभास्थानमा अनी रस्तावर आपलापुढे शंख वाजाडतस तसं करू नको, मी तुमले सत्य सांगस की, त्यासले त्यानं प्रतिफळ मिळी जायेल शे. 3 तु जवय दानधर्म करस, तवय तूना उजवा हात काय करस, हाई तुना डावा हातले समजाले नको. 4 जवय तु दानधर्म करस, ते गुप्तपणे व्हवाले पाहिजे, म्हणजे तुले दखणारा, गुप्त पिता परमेश्वर तुले तूनं फळ दि.