25 यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही? 33 तर तुम्हीन पहिले देवना राज्य अनी त्यानी धार्मीकता मिळाकरता त्याना शोध करा. म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन.