25 यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही? 26 आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही? 27 तुमनामा, असा कोण समर्थ शे की, चिंता करीसन आयुष्यनी येळ तासभर वाढावू शकस?
Publicidade