28 तसच कपडासकरता कशाले चिंता करतस? जंगलमधला फुलं दखा, त्या कशा वाढतस? त्या कष्ट नही करतस अनी सुत बी नही ईनतस. 29 तरी मी तुमले सांगस, शलमोन राजासुध्दा त्याना वैभवमा त्या फुलसपैकी एकनामायक सुध्दा सजेल नव्हता. 30 जे जंगलमाधलं गवत आज शे, अनी सकाय जाळाय जास, त्याले जर देव असा कपडा घालत व्हई, तर अहो अईश्वासीहो, तो तुमनी काळजी करीसन तुमले कपडा घालावू नही का?