2 तवय दखा, एक कुष्टरोगी येशुकडे ईसन त्याना पाया पडीन त्याले बोलना, प्रभुजी, तुमनी ईच्छा व्हई तर माले शुध्द करासाठे तुम्हीन समर्थ शेतस. 3 तवय येशुनी हात पुढे करीसन त्याले स्पर्श करा अनं बोलना, मनी ईच्छा शे, तु शुध्द व्हय; अनं लगेच त्याना कुष्टरोग जाईसन तो बरा व्हयना. 4 मंग येशुनी त्याले सांगं, संभाळ, हाई कोणलेच काही सांगु नको; तर तु जाईसन "याजकले दखाड अनी त्यासले खरं वाटाले पाहिजे म्हणीसन तुना शुध्दीकरण व्हवाकरता, जे अर्पण मोशेनी कराले लाई देयल शे ते कर."