26 अनं तो त्यासले बोलना, "अरे अईश्वासी, तुम्हीन इतला का बरं घाबरणात?" मंग त्यानी ऊठीसन समुद्र अनं वारा यासले धमकाडं अनी त्या लगेच शांत व्हयनात. 27 त्या नावमधला माणसंसले आश्चर्य वाटनं अनं त्या बोलु लागनात, "हावु कोणता प्रकारना माणुस शे की, वारा, अनं समुद्र बी यानं ऐकतस."