येशु दोन भूत लागेल माणुससले बरं करस
28 मंग येशु पलीकडला गरसेकरसना प्रदेशमा गया, तवय दोन भूत लागेल माणसं कब्रस्तान माईन ईसन त्याले भेटनात; त्या ईतला भयानक अनं भितीदायक व्हतात की, त्या वाटवर कोणलेच जाणं शक्य नव्हतं. 29 तवय दखा, त्या वरडीन बोलनात, "हे देवना पोऱ्या; तु आमनामा का बरं पडस? ठरायेल येळना अगोदर तु आमले आठे छळाले येल शे का?" 30 तठेच त्यासनापाईन थोडा अंतरवर डुकरंसना मोठा कळप चरी राहींता. 31 मंग त्या भूते त्याले ईनंती कराले लागनात की, जर तु आमले काढी ऱ्हायना तर आमले त्या डुकरंसना कळपमा धाड.
32 मंग येशुनी त्यासले सांगं, "जा," अनी त्या जाईसन त्या डुकरंसमा घुसनात; अनं दखा, तो डुकरंसना कळप कडावरतीन पळत जाईसन समुद्रमा पडना अनी तठेच त्या बुडिसन मरनात. 33 मंग डुकरं चारनारा पळनात अनं नगरमा जाईसन भूत लागेल माणुसबद्दल अनी तठे घडेल सर्व घटनाबद्दल त्यासनी लोकसले सांगं. 34 तवय दखा, सर्व नगरना लोके येशुले भेटाले निंघनात अनी त्याले दखीसन, त्यासनी त्याले आमना गावमाईन निंघी जा अशी ईनंती करी.