याईरनी पोर अनं रक्तस्रावी बाई
18 येशु त्यानासंगे बोली राहींता तवय दखा, एक अधिकारी ईसन त्याना पाया पडीसन बोलना, "मनी पोर इतलामा मरनी, तरी तुम्हीन ईसन तिना डोकावर आपला हात ठेवा म्हणजे ती जिवत व्हई." 19 तवय येशु ऊठना अनं त्याना शिष्यससंगे त्या अधिकारीना मांगे जावाले लागना. 20 मंग, दखा बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हयेल एक बाईनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा. 21 कारण ती आपला मनमा बोलनी, की मी त्याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसू. 22 तवय येशु मांगे वळीसन तिले दखीन बोलना, "बाई, धीर धर! तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे," अनं ती बाई त्याच घटकाले बरी व्हयनी. 23 मंग येशु अधिकारीना घरमा जाईन पावा वाजणारासले अनं शोक करनारा लोकसनी गर्दीले दखीसन बोलना, 24 "वाट सोडा, कारण पोर मरेल नही; ती झोपेल शे!" तवय त्या त्यानी टिंगल करू लागनात. 25 मंग लोकसले बाहेर काढानंतर त्यानी मझार जाईसन त्या पोरना हातले धरं अनी ती लगेच ऊठनी. 26 हाई बातमी देशना त्या प्रांतमा पसरी गयी.