एकमेकसना न्याय करानं नही
1 १४:१ कलस्सै २:१६ जो ईश्वासमा अशक्त शे त्याना स्विकार करा, पण त्याना व्यक्तीगत ईचारबद्दल वाद करानं नही. 2 एखादानं ईश्वास अस ऱ्हास की, त्याले कसं बी खावानं चालस; पण जो अशक्त शे तो भाजीपालाच खास. 3 जो खासपेस त्यानी न खाणाराले तुच्छ लेखानं नही; अनी जो खासपेस नही त्यानी खाणाराले दोष देवानं नही; कारण देवनी त्याना स्विकार करेल शे. 4 दुसराना चाकरले दोष लावणारा तु कोण शे? तो स्थिर राहिना काय किंवा पडना काय, तो त्याना धनीना प्रश्न शे. त्याले तर स्थिर करामा ई; कारण त्याले स्थिर कराले त्याना धनी समर्थ शे.