देवनासंगे समेट
1 तर आते, आपन ईश्वासतीन देवसमोर न्यायी ठरी जायेल शेतस, म्हणीन आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवनासोबत शांतीमा शेतस. 2 आपन जिवन जगी राहिनुत त्या कृपामा बी त्यानाद्वारा ईश्वासतीन आपलाले प्रवेश भेटेल शे अनं आपण देवना गौरवना आशामा अभिमान मिरावतस.