12 म्हणीन तुम्हीन आपला शरीर वासनासना अधीन न व्हावं म्हणीन आपला मरणारा शरिरमा पापनं राज्य चालु देवानं नही. 13 अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा. 14 तुमनावर पापनी सत्ता चालावु नही; कारण तुम्हीन नियमशास्त्रना अधीन नहीत, पन देवना कृपाना अधीन आणेल शेतस.
15 मंग काय? आपन नियमशास्त्रना अधीन नहीत, देवना कृपाना अधीन शेतस म्हणीन पाप करानं का? अजिबात नही. 16 तुम्हीन ज्याले आपले स्वतःले दास म्हणीन आज्ञा पाळाकरता समर्पन करतस, तुम्हीन ज्याना आज्ञा पाळतस त्यासना दास शेतस, त्या मरणनाकरता पापना किंवा न्यायीपणनाकरता आज्ञापाळाना, हाई तुमले ठाऊक नही का? 17 पन देवना धन्यवाद, कारण तुम्हीन पापना दास राहिसन बी तुमले ज्या शिक्षणंना नियमना अधीन ठेवात, त्याना तुम्हीन मनपाईन आज्ञा पाळात. 18 अनी पापपाईन मुक्त व्हईन तुम्हीन न्यायीपणना दास व्हयनात.