4 म्हणीन मना भाऊ अनी बहिणीसवनं, तुम्हीन पन ख्रिस्तना शरिरद्वारा नियमशास्त्रले मरेल जायेल अस शेतस; म्हणजे तुम्हीन दुसराना, जो मरेल मातीन ऊठेल शे, त्याना व्हवाले पाहिजे; म्हणजे आपन देवले फळ देवाले पाहिजे. 5 कारण आपन शरीर स्वभावना अधीन व्हतुत, तवय नियमशास्त्रना द्वारा उद्रवयेल पापनी वासना आपला अवयवमा मरणले फळ देवाकरता कार्य करी राहिंतात. 6 पन आपन ज्याना बंधनमा व्हतुत त्याले आपन मरेल ऱ्हावामुये आपन आते नियमशास्त्र पाईन मुक्त व्हयेल शेतस, ते यानाकरता की, आपन आत्माना नविनपनतीन सेवा करानं, शास्त्रलेखना जुना पनतिन नही.