28 कारण आपलाले ठाऊक शे की, देववर प्रिती करनारा म्हणजे त्याना योजनाप्रमाने बलायेलसले देवना करणीमुये सर्व गोष्टी त्यासले मिळीसन त्यासना चांगलासाठे सहकार्य करतस. 29 कारण त्याले ज्यासनाविषयी पुर्वज्ञान व्हतं ते आपला पोऱ्याना प्रतिरूपमा प्रगट व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानी त्यासले अगोदरच नेमी ठेवा; ह्यामा हाऊच हेतु शे की, तो पुष्कळ बंधुजनसमा जेष्ठ व्हवाले पाहिजे.