परिक्षा अनी मोह
12 जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी. 13 कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही. 14 तर प्रत्येक माणुस आपला वासनाघाई वढाई जाई अनी भुल व्हयेलना मायक मोहमा पडस. 15 मंग वासना गर्भवती व्हईसन पापले जन्म देस अनी पाप पक्क व्हवावर मरणले जन्म देस.