ईश्वास अनं कर्म
14 मना भाऊ अनी बहिणीसवन, माले ईश्वास शे अस कोणी म्हणत व्हई अनी तो तसा वागत नही व्हई तर त्यापाईन काय लाभ? तो ईश्वास त्यानं तारण कराले शक्तीमान शे का? 15 भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे. 16 अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ? 17 यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.