बढाई माराले नको म्हणीसन इशारा
13 अहो, ज्या तुम्हीन म्हणतस आपण आज सकाय अमुक शहरले जावुत, तठे एक वरीस राहूत अनी व्यापार करीसन पैसा कमाडूत, 14 त्यामा तुमले सकायनं समजस नही तुमनं आयुष्य काय शे? तुम्हीन वाफ शेतस ती थोडा येळ दिसस अनी मंग दखास नही. 15 अस नही म्हणता प्रभुनी ईच्छा व्हई तर आपण जगीसन हाई किंवा ते काम करूत अस म्हणा. 16 आते तुम्हीन स्वतः फुशारकी मारतस अनी गर्व करतस, असा प्रकारनी सर्व फुशारकी वाईट शे.
17 चांगलं करनं समजस तरी जो तसा वागस नही. त्याले ते पाप शे.