धीर अनी प्रार्थना
7 अहो भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुना आगमन पावत धीर धरा, दखा, शेतकरी भुमीना मोलवान पीकनी वाट दखतांना त्याले पहिला अनी शेवटला पाऊस भेटापावत त्यानाबद्दल तो धीर धरस. 8 तुम्हीन बी धीर धरा, आपला मनंसले स्थिर करा, कारण प्रभुनं आगमन जोडे येल शे.