3 तसच म्हताऱ्या बायासनी चाल चलनमा आदरणीय ऱ्हावाले पाहिजे; त्या चहाडखोर, मद्यपान करणाऱ्या नही ऱ्हावाले पाहिजेत; चांगलं शिक्षण देणाऱ्या ऱ्हावाले पाहिजेत; 4 त्यासनी तरूण बायासले अस शिक्षण देवाले पाहिजे की, त्यासनी आपला नवरावर अनं पोऱ्यासोऱ्यासवर प्रेम कराले पाहिजे; 5 त्यासनी मर्यादाशील, शुध्द, घरणं काम दखणाऱ्या, मायाळु, आपआपला नवरासना अधीन राहणाऱ्या असा ऱ्हावाले पाहिजेत, म्हणजे देवकडतीन येल वचननी निंदा व्हवाऊ नही.