14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. 15 जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. 16 कारण पवित्र शास्त्र म्हणते,
"प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?"
परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.