7 प्रियांनो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास आरंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. 8 तरीही मी एकप्रकारे नवी आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.