10 तुम्हास प्राप्त होणार्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते.