12 परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या अंकित होऊन राहणे
13 प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. 14 जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत.