Pular para o conteúdo
Publicidade

पेत्राचे पहिले पत्र 5:2,3,5,7,10

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

2 तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने, द्रव्यलोभासाठी नाही पण उत्सुकतेने करा 3 आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा. 5 तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.

7 तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.

10 पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    2 तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा; 3 जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा.

    5 त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण,

    "परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात

    परंतु नम्रजनावर कृपा करतात."5:5 नीती 3:34

    7 तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.

    10 तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

1 Pedro
Ver todos os capítulos de 1 Pedro