11 तेव्हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याशी नाथान बोलला, "हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा झाला, आणि आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही, असे तुझ्या कानावर आले नाही काय?" 12 तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील. 13 तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? "खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?" तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?