11 यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, "जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो" मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.