15 तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली, "असे नाही, माझ्या स्वामी, मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतत आहे." 16 "आपली दासी दुष्ट स्त्री आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या यातना व क्लेश यांमुळे आतापर्यंत बोलले आहे."