11 तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, "तुझे सर्व पुत्र आले आहेत का?" मग तो म्हणाला, "आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे." तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. "त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही." 12 मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, "उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे." 13 मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
Publicidade
1 शमुवेल 16
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.